नमस्कार मंडळी, सगळेजण घरात सुखरूप आहात अशी मी आशा करत आहे, कारण सध्याची परिस्थिती खूपच भयानक आहे.stay home stay safe☺️
आजच्या भागात आपण नीताच बालपण कसं होतं ते बघूया चला तर मग उशीर काय करताय?
"काही वादळ विचलित
करण्यासाठी नव्हे तर
वाट मोकळी करण्यासाठी
येत असतात"
आजच्या भागात आपण नीताच बालपण कसं होतं ते बघूया चला तर मग उशीर काय करताय?
नीताच बालपण छान सुरू होतं, किती सुंदर असतं ना कशाची चिंता, ना कशाची काळजी फक्त इकडे तिकडे बाळगणे,खेळणे आणि 🏠 येऊन आई आई करणे.. वर्गात हुशार मुलगी होती, मग इथून तिच्या जीवनाचा खडतर प्रवास सुरू झाला, अचानक वर्ग तिसरीत असताना तिच्या डोक्यात जखम झाली, अगोदर ते छोटंसं होतं,केस गळत होते.मग दवाखान्यात दाखवले तर गोळ्या दिलेत.पण जखम काही कमी होत नव्हतं उलट ते वाढत गेला.ते जखम इतकं दुखायच हळूहळू तिचं बाहेर खेळण बंद झालं, कोणाशी बोलत नव्हती, खूप रडायची अक्षरशः वेदनेमुळे तिला रात्री झोप पण येत नव्हतं.मग तिचे वडील झोपाळा बांधून तिला त्यात झोपवायच प्रयत्न करायचे.पण या सगळ्या वेदनेत तिचे आई-वडील तिच्या सोबत खंबीरपणे उभे होते.वडील दररोज मलमपट्टीसाठी दवाखान्यात घेऊन जायचे, मलमपट्टी करताना अक्षरशः त्यांना चक्कर यायचं.ते दोघेपण आतून एकदम खचून गेले होते पण चेहर्यावर कधी दाखवले नाहीत.
देव म्हणजे आई-वडील.वडील सोलापूरातील सगळ्या दवाखान्यात दाखवलेत आणि आई सगळ्या मंदिरात जाऊन प्रार्थना करायची.पण बाकीच्या मुलींसारख ती वेण्या घालू शकत नव्हती.नेहमी ती डोक्याला कापड बांधायची जेणेकरून ते जखम कोणाला दिसू नये.खूप प्रयत्नानंतर तिचा जखम ब-यापैकी कमी झाला.देवाकडे एकच प्रार्थना करते, अशी परिस्थिती कोणाला देऊ नये आणि मला यातून बाहेर काढल्याबददल धन्यवाद !! ,🙏🙏"काही वादळ विचलित
करण्यासाठी नव्हे तर
वाट मोकळी करण्यासाठी
येत असतात"