नमस्कार,
सगळे कसे आहात? ठीक आहात ना? मी तर छान आहे पण मला माफ करा कारण मी खूप दिवसानंतर पुढील भाग लिहीत आहे कारण मी नंतर सांगणार चला तर आपण पुढे काय झालं ते बघूया?
मी आणि माझी बहीण मोनिका आम्ही लहानपणापासून आजीकडे राहिलो कारण परिस्थिती तशी होती. तेव्हा आम्हाला काही कळायचं पण नाही. या वयात सगळ्यांना आईवडिलांची खूप जरुरत असते. आम्हाला परिस्थिती समोर घुटन टेकाव लागलं. तेव्हाच मी एक किस्सा सांगते माझी बहीण लहान असताना दिवसभर खेळायची, मुलं म्हणजे खेळणारच त्यामुळे रात्री झोपेतून उठून रडायची आणि म्हणायची माझं माझे पाय दुखत आहेत माझे पाय दाबून दे तेव्हा मी पण लहान होते तर मग मी पण तिला रागवायची मी नाही पाय दाबणार असं तसं पण शेवटी मला तिला सांभाळून घ्यायचं होतं म्हणून मी तिचे पाय दाबायची तेव्हा कसंतरी वाटायचं कारण आई-बाबा पासून दूर होतो रडू यायचं पण शेवटी स्वतःला सांभाळून घ्यायचो.
माझ्या मैत्रिणी दररोज घरी गेल्यावर सगळ्या गोष्टी त्यांच्या आई-बाबांना सांगायच्या. पण आम्ही घरी शनिवारी दुपारी जायचो आणि रविवारी रात्री यायचो जसं मुली लग्नानंतर माहेरी येतात तेव्हा त्यांची मनाची हालचाल काय असते ते आम्ही लहानपणापासूनच अनुभवलो.काही लोक आम्हाला चिडवायचे माहेरी जाऊन आलात का? तेव्हा आठवडा बराच्या सगळ्या गोष्टी आई बाबांसोबत बोलायचं.आजीकडे सगळ्या काही सुविधा होत्या पण आई बाबा नव्हते कधीकधी मन भरून यायचं सणाच्या दिवशी आई आजीकडे यायची तेव्हा मी आणि बहीण खूप आनंदी व्हायचो आणि तिला नेहमी आणखीन दोन दिवस जास्त राहावे म्हणून जिद्द करायचो. शेवटी एकच सांगू इच्छिते परिस्थिती कितीही वाईट असली तरी मुलांना आपल्यापासून दूर ठेवू नका ही माझी मनापासून सगळ्यांना विनंती आहे धन्यवाद!
